हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोकादायक मालवेअर अॅपमुळे गुगलने प्लेस्टोअर मधून 30 लोकप्रिय अॅप्सना काढून टाकले आहेत. आता यापुढे प्ले स्टोअर वरून आपल्याला ते अॅप्स डाउनलोड करता येणार नाहीत. गुगलने याबाबत असे म्हटले आहे की, या अॅप्समध्ये अनेक धोकादायक असे मालवेअर आढळले आहेत, ज्यामुळे ते प्ले स्टोअर वरून त्वरित हटविण्यात आलेले आहेत. जर आपल्या फोनमध्येही यापैकी कोणतेही अॅप्स असतील आपणही त्यांना लगेचच अनइंस्टॉल केले पाहिजे. चला तर मग या 30 अॅप्सविषयी माहिती करून घेऊयात –
2 कोटीपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले
नवीन युझर्स आता यांपैकी कोणतेही अॅप्स प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकणार नाहीत, आतापर्यंत हे अॅप्स 2 कोटीपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहेत. गुगलने युझर्सना आपल्या फोनवरून हे अॅप्स अनइंस्टॉल करण्याचा सल्ला दिलेला आहे. या अॅप्स विषयी माहिती खालीलप्रमाणे-
अॅप | इंस्टॉल |
Yoriko Camera | 1 लाख |
Solu Camera | 5 लाख |
Lite Beauty Camera | 10 लाख |
Beauty Collage Lite | 5 लाख |
Beauty and Filters camera | 10 लाख |
Photo Collage and beauty camera | 1 लाख |
Gaty Beauty Camera | 5 लाख |
Pand Selife Beauty Camera | 50 हजार |
Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera | 10 लाख |
Benbu Seilfe Beauty Camera | 10 लाख |
Pinut Selife Beauty and Photo Editor | 10 लाख |
Mood Photo Editor and Selife Beauty Camera | 5 लाख |
Rose Photo Editor and Selfie Beauty Camera | 10 लाख |
Selife Beauty Camera and Photo Editor | 1 लाख |
Fog Selife Beauty Camera | 1 लाख |
First Selife Beauty Camera and Photo Editor | 50 लाख |
Vanu Selife Beauty Camera | 1 लाख |
Sun Pro Beauty Camera | 10 लाख |
Funny Sweet Beauty Camera | 5 लाख |
Little Bee Beauty Camera | 10 लाख |
Beauty Camera and Photo Editor Pro | 10 लाख |
Grass Beauty Camera | 10 लाख |
Ele Beauty Camera | 10 लाख |
Flower Beauty Camera | 1 लाख |
Best Selfie Beauty Camera | 10 लाख |
Orange Camera | 5 लाख |
Sunny Beauty Camera | 10 लाख |
Pro Selfie Beauty Camera | 5 लाख |
Selfie Beauty Camera Pro | 10 लाख |
Elegant Beauty Cam-2019 | 50 हजार |
रिपोर्टमध्ये झाला खुलासा
WhiteOps च्या सिक्योरिटी रिसर्चर्सनी या अॅप्सविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. अशा प्रकारच्या अॅपमध्ये, आपल्याला बर्याच जाहिराती पहायला लागतात. यासह त्यांच्या कुठल्याही लिंकवर क्लिक न करताही, युझर्स त्यांच्याकडे रीडायरेक्ट व्हायला लागतात. आपल्या फोनमध्येही जर यापैकी कोणतेही अॅप इंस्टॉल केले गेले असेल तर ते त्वरित अनइंस्टॉल करा
अॅपमध्ये लपले होते मालवेअर
समोर आलेल्या या अॅप्सना 2 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. WhiteOps द्वारे असे म्हटले गेले होते की हे अॅप्सना युझर्सच्या डिवाइसमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखविण्यासाठी तयार केले गेले होते. प्ले स्टोअरवरून काढण्यापूर्वी असे बरेच अॅप्स सुमारे 17दिवस उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.