Monday, February 6, 2023

कोरोना संकटात ‘गुगल’चा भारताला हात…तब्बल 135 कोटींची करणार मदत, सुंदर पिचाई यांची घोषणा

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. अशातच काही लोकांना बेड मिळत नाहीये, तर काही लोकांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीयेत मात्र भारताच्या या संकट काळात अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. अशातच आता सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या ‘गुगल’ ने भारताला मदतीचा हात दिला आहे. गुगल ने भारतासाठी 135 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल ही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गुगलने सोमवारी १३५ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे त्वरित ऑक्सिजन व चाचणी उपकरणासह त्वरित वैद्यकीय पुरवठा करण्यास मदत होईल.
सर्वप्रथम कोरोनाने तीव्र ग्रस्त असलेल्या कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करण्यासाठी रोख मदत पुरविणे हा हेतू आहे . दुसरे UNICEF द्वारा ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह तातडीने वैद्यकीय पुरवठा करण्यात मदत करण्याची आवश्यकता आहे, असे भारताचे कंट्री हेड व व्हीपी संजय गुप्ता यांनी सांगितले.

- Advertisement -

याबाबत बोलताना ट्विट करत सुंदर पिचाई म्हणाले की, “भारतातील कोविडचे संकट पाहून चिंता वाटते गुगल आणि गुगलर्स कडून भारत युनिसेफ ला वैद्यकिय पुरवठा करण्यासाठी 135 कोटी रुपयांची तरतूद करत आहे”.