Wednesday, February 1, 2023

घाबरु नका, येणार तर मोदीच; ‘या’ अभिनेत्याने मोदी विरोधकांना फटकारले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सध्याच्या या कोरोना परिस्थितीला मोदींच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली असता जेष्ठ अभिनेते अनुपम खेर पुन्हा एकदा मोदींच्या मदतीला धावून आले. घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं म्हणत त्यांनी शेखर गुप्ता याना उत्तर दिलं.

काय म्हणाले होते शेखर गुप्ता

- Advertisement -

“साठच्या दशकाचा मुलगा म्हणून मी अनेक संकटं पाहिली आहेत. ज्यात 3 पूर्ण युद्धं, अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे हे आपल्यावरील सर्वात मोठे संकट आहे. मात्र भारताने कधीच सरकारचा अभाव पाहिलेला नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदारी घेत नाही. हा प्रशासनाचा पराभव आहे” अशा शब्दात शेखर गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अनुपम खेर यांचं प्रत्यतर-

आदरणीय, हे आता जास्तच झाले. तुमच्या स्टँडर्डहूनही. कोरोना एक संकट आहे, सर्व जगासाठी. या महामारीचा सामना आम्ही आधी कधीच केला नाही. सरकारवर टीका जरुरुची आहे. पण कोरोना संकटाविरोधात लढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेही घाबरू नका, येणार तर मोदीच, जय हो.

अनुपम खेर हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू उचलून धरतात. अनेक वेळा त्यांनी ट्विट करत मोदी विरोधकांना फटकारले आहे. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर चंदिगढमधून भाजप खासदार आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.