हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उपकंपनी वेरिलीने (Verily) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन (LinkedIn) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सीएनबीसीने (CNB) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणारी अल्फाबेटच्या मालकीची व्हेरिली ही पहिली कंपनी आहे.
Verily च्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यानेही कंपनी सोडली आहे. कर्मचार्यांना Verily च्या सहयोगी ब्रँड Google मधून देखील कमी केले जाऊ शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. मात्र, कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सीएनबीसी ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की, वेरिलीचे सीईओ स्टीफन गिलेटकडून कर्मचाऱ्यांना एक ईमेल प्राप्त झाला. यामध्ये काही आठवड्यांपर्यंत कर्मचार्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जे आज ऑफिस मध्ये आहेत ते आता घरी परत जाऊ शकतात असं म्हंटल. याशिवाय, ई-मेलमध्ये म्हटले आहे की, प्रभावित कर्मचार्यांना त्यांच्या रोलबाबत महत्त्वाची अपडेट लवकरच दिली जाईल. जे सध्या नोकरी करत आहेत त्यांना Verily Headline व तुमच्या रोलबाबत ई-मेल मिळेल.
या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेबाहेरील इतर देशात राहून कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा ई-मेल पाठवला जाईल. या ई-मेल्सचा हवाला देत सीएनबीसी रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारचे बंद ही कंपनी भविष्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या तयारीत असल्याची झलक आहे. कंपनी अनेक कार्यकारी बदल देखील करत आहे. Verily चे उपकरण व्यवसायाचे अध्यक्ष, Jordi Parramon, जे सुरुवातीच्या दिवसांपासून कंपनीचा भाग आहेत, यांनी कंपनी सोडली आहे. यापूर्वी 2022 मध्येही फेसबुकच्या मालकीच्या मेटा, ट्विटर, अॅमेझॉन आणि सेल्सफोर्स, गोल्ड मॅन साच यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.