कसलेल्या राजकारण्यासमोर नवखी उर्मिला तग धरणार का?

0
47
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागील लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवलेल्या गोपाळ शेट्टींशी सामना

मुंबई प्रतिनिधी |

बॉलिवुडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर तिला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीही जाहीर झाली आहे. तिचा सामना भाजपचे तगडे उमेदवार विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेता गोविंदाने राम नाईक यांना पराभूत केले होते. गेल्या निवडणूकीत मोदी लाटेत या मतदार संघातून गोपाल शेट्टी मोठ्या फरकांनी जिंकले होते.

माजी खासदार संजय निरूपम यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिल्याने उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या मतदार संघात उर्मिला मातोंडकर चमत्कार घडवते का,याची उत्सुकता आहे. दरम्यान, आपला लढा काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात आहे, कुठल्याही उमेदवाराविरोधात नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे.

उर्मिला यांनी निवडणूक लढवत एकप्रकारे आपल्याला मदत केली आहे. आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास शेट्टींनी व्यक्त केला आहे.निवडणूक रिंगणात उतरल्यावर लगेचच युतीच्या सरकारने देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण अधिक वाढलं आहे, असा घणाघात उर्मिला मातोंडकरने केला.देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? असा थेट सवालही उर्मिलाने विचारला होता. उर्मिला मातोंडकर या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना कितपत टक्कर देऊ शकेल, याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here