सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळी उपाययोजनाचा मागण्यासाठी काढण्यात आलेली मोर्चानंतर पडळकर पत्रकारांशी बोलत होते. मतमोजणी सुरु होण्यापूर्वी मोबाईलचे टॉवर सकाळी सात वाजल्यापासून बंद करावेत. याशिवाय मतमोजणी केंद्र परिसरातील १५ किलोमीटरपर्यंत टॉवर बंद करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. लोकांमध्ये चर्चा आहे की तीन नंबरचा उमेदवार एक्झीट पोल मध्ये प्रथम क्रमांकावर कसा काय येऊ शकतो ?, त्यामुळे यांना वातावरण निर्मिती करून यांना ईव्हीएम मध्ये काही तरी घोटाळा करायचा आहे. व्हीव्हीपॅट पाचच मोजून काय उपयोग ? ज्या ठिकाणी शंका आहे, तिथे सर्व व्हीव्हीपॅट मोजणे गरजेचे आहे असे मत पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
निवडणूक प्रक्रीयेत बदल केला नाही, आणि निकाल चूकीचे लागले तर देशात अराजकता माजेल, दंगली होती. लोकांचा हा मलभूत अधिकार आहे. लोकांच्या भावनेशी खेळणे सोपे नाही. म्हणजेच यामध्ये कुठेतरी काळाबाजार आहे. मी उमेदवार व भारतीय नागरिक म्हणून आम्हाला निवडणूक प्रक्रीयेवर आक्षेप आहे. याठिकाणी मोबाईल नेटवर्क बंद करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही, तर आम्ही निवडणूक प्रक्रीयेवर बहिष्कार घालू, लोकांच्या शंकाचे निरसन करणे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचा विचार करणार नसाल तर आमचा या सर्व प्रक्रियेला विरोध असेल. लोकांची पोलच्या माध्यमातून मानसिकता करुन निकाल बदलण्याच्या प्रकाराचा मी निषेध नोंदवत असल्याचेही पडळकर यांनी सांगितले