वंचित आघाडीसाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या नावे चर्चांना उधाण

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोशल मीडियावर गोपीचंद पडळकरांचं संघातील छायाचित्र व्हायरल होत आहेत.

सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे

     वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुद्धा थेट निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत उमेद्वारांच्या बदलाच्या चर्चा होत आहेत. यापूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघात विठ्ठल सातव यांना उमेद्वारी देण्यात आली होती पुन्हा उमेदवार बदलून अनिल जाधव यांना देण्यात आली.

  सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाश शेंडगे यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे. भाजप कडून संजय काका पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील हे उमेदवार असणार आहेत.
गोपीचंद पडळकर हे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन वंचित आघाडीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

 प्रकाश आंबेडकर आणि गोपीचंद पडळ कर यांच्या भेटी दरम्यान सांगली मतदारसंघाबद्दल चर्चा होणार आहे.दरम्यान सोशल मिडीयावर पडळकरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील एक फोटो व्हायरल होतोय.आपला प्रमुख विरोधक संघ आणि भाजप आहे असं मानणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर टीकेची झोड विरोधक सोशल मिडियावर उडवत आहेत.