हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हीडिओ बनवला, व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे टीव्हीवर, ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सतत सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शहर पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. रोहित पवार तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल,” अशी टीकाही पडळकर यांनी केली.
मा.@PawarSpeaks यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या @RRPSpeaks यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे.मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये.@News18lokmat@abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi pic.twitter.com/299qq7RUpF
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2020
‘रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल. मिरजगाव मधील गावातील साधा रस्ता तुम्हाला करता येत नसेल, आणि देशाच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा. राज्यामध्ये तुमचे सरकार आहे. येत्या काही दिवसात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे, व मग बाकीच्यांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’