गोपीचंद पडळकर यांचा सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

0
44
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनधी । प्रथमेश गोंधळे

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मोटारसायकल रॅली काढून पडळकर यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान खासदार संजय पाटील यांच्यासारखे गुंड यापुढील निवडणुकीत दिसणार नाहीत, याबाबतची खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वासही उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजनचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मोटरसायकल रॅली काढून दुपारी बाराच्या सुमारास अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तत्पूर्वी उमेदवारी अर्जाची तपासणी प्रशासनाकडून करुन घेतली. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना पडळकर यांच्या सोबत प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंगडे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष पिरजादे, बहुजन वंचितचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सचिन माळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ उपस्थित होते.

लोकशाहीचा शुभारंभ आणि घराणेशाहीचा अस्त या निवडणुकीत होईल, यात कोणतीही शंका नाही. येथील निवडणुकीनंतर राज्यात एक चांगला संदेश जाईल. घराणेशाही नको आहे. आजोबा झाले की बाप आणि त्यानंतर मुलगा ही परंपरागत चौकट मोडून काढण्यासाठी माझा लढा आहे. दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here