हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आषाढी वारीच्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूर असा भर पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत प्रवास केला. तसेच विठ्ठलाची शासकीय महापूजाही केली. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही.” असे पडळकरांनी म्हंटल आहे.
पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हंटले आहे कि, ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंढरपूरला स्वतः गाडी चालवत जाऊन तेथील विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. त्या ठिकाणी खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही मुख्यमंत्री ठाकरे यांना सुटत नाही. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही,” अशा शब्दात पडळकरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही.@BJP4Maharashtra @CMOMaharashtra #MahaVikasAghadi
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 21, 2021
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जाते. त्यांनी अनेकवेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून पडळकरांनी टीका केली आहे.