हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.
उद्धव ठाकरेंनी चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत आपल्या व्यथा मांडल्या. काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी पूरग्रस्त महिलेने केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचं म्हणणं ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1419214021014691842?s=20
नुकसानीची काळजी करू नका सर्वाना मदत करण्यात येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिले. जीवित हानी होऊ न देण्याला आपलं प्राधान्य राहील. तुम्हाला तुमच्या पायावर उभं कस करायचं याची जबाबदारी सरकार घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पाणी कुठून आलं कस आले याबाबत जास्त विचार करू नका. सरकारकडे त्याचा आढावा आलेला आहे. इथून पुढे अशा प्रकारचा महापूर नंतर कधी येऊ नये यासाठी आपल्याला जलव्यवस्थापन करावं लागेल त्यासाठी थोडा अवधी लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटल