Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Shopping : बऱ्याचदा असे घडते की आपण ई-कॉमर्स साइटवर एखाद्या प्रॉडक्टचे रिव्यू पाहून ती खरेदी करतो.मात्र प्रत्यक्षात त्याच्या क्वालिटी मध्ये बराच फरक असतो. कित्येकदा खराब प्रॉडक्ट्स देखील दिले जाते. आता प्रश्न असा पडतो कि, असे का होते ??? हे फेक रिव्यू दिल्यामुळे होऊ शकते, जे बऱ्याचदा प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपनीकडून दिले जाते. आता केंद्र सरकारकडून ई-कॉमर्स वेबसाइटवरील उत्पादनांना देण्यात येणाऱ्या फेक रिव्यूची दखल घेतली गेली आहे. यासाठी आता ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि एडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) एकत्रितपणे ई-कॉमर्स कंपन्यांसह सर्व भागधारकांसोबत बैठक घेणार आहेत.

Amazon and the problem of fake reviews - YouTube

याबैठकीमध्ये ऑनलाइन उत्पादनांबाबतच्या फेक रिव्यूमुळे होणारे ग्राहकांचे नुकसान आणि त्यांची दिशाभूल याबाबत चर्चा होणार आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत फेक रिव्यूचा ग्राहकांवर कसा परिणाम होतो हे तपासले जाणार आहे. तसेच त्यांना रोखण्यासाठी काय उपाय करता येतील यावर देखील चर्चा केली जाणार आहे. यासंदर्भात ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांच्याकडून सर्व पक्षांना पत्र देखील लिहिले गेले आहे.Online Shopping

E-commerce brands and their battle with fake online reviews

रिलायन्स रिटेल, फ्लिपकार्ट, एमेझॉन, टाटा सन्स यासारख्या प्रमुख ई-कॉमर्स संस्था देखील यामध्ये समाविष्ट आहेत. रोहित कुमार यांनी सर्व भागधारकांसोबत युरोपियन युनियनमधील 223 प्रमुख वेबसाइट्सवरील ऑनलाइन रिव्यूचे स्क्रीनिंग शेअर केले. यावेळी या स्क्रिनिंगमध्ये असे दिसून आले की जवळपास 55 टक्के वेबसाइट्स कडून EU ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले जाते. यापैकी तब्ब्ल 144 वेबसाइट्सनी तर फेक रिव्यूजना आळा घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न देखील केलेले नाहीत. बऱ्याचदा असेही घडले आहे की कोणतेही प्रॉडक्टची खरेदी झालेली नसतानाही त्याला रिव्यू दिले गेले आहेत.Online Shopping

 

Amazon's review scandal | FULLSYNCसचिवांनी या पत्रात म्हटले आहे की, ऑनलाइन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे, ज्यामध्ये सातत्याने वाढ देखील होते आहे. ते पुढे म्हणाले की,” ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील प्रॉडक्ट्सची खरेदी फक्त फोटो पाहूनच करतो. अनेक ग्राहक कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यापूर्वी तिचे रिव्यू पाहतात. ज्यावर विश्वास ठेवून खरेदी करतात. इथे हे लक्षात घ्या कि, असे बनावट आणि दिशाभूल करणारे रिव्यू म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत दिलेल्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन आहेत. ज्या अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकेल. Online Shopping

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://consumeraffairs.nic.in/acts-and-rules/consumer-protection

हे पण वाचा :

Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट !!!

Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या

RBI FD Rules : RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या

Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा

Leave a Comment