हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून 8 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 25 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्त व्याज देत आहेत. तर आजच्या या बातमीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्त व्याज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रमुख बँकांच्या व्याजदरांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत…
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठी 4.00% ते 7.75% दरम्यान व्याज दर दिला जातो आहे. तसेच, सुपर ज्येष्ठ नागरिकांना यावर सर्वाधिक 8.05% व्याजदर मिळेल. आता बँक 666 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% ते अति ज्येष्ठ नागरिकांना 8.05% व्याजदर मिळेल. Bank FD
कॅनरा बँक
कॅनरा बँकेकडून 400 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.65% व्याजदर दिला जातो आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7 ते 45 दिवसांच्या FD वर किमान व्याजदर 3.25% पासून सुरू होतो. Bank FD
बँक ऑफ बडोदा
17 मार्च 2023 रोजी बँक ऑफ बडोदाकडून FD वरील व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.55% पर्यंत व्याजदर मिळणार आहे. तसेच दुसरीकडे, बडोदा ट्रायकोलर प्लस डिपॉझिट योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 399 दिवसांच्या FD वर 7.55% तर 5 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर 7.5% व्याज दर मिळेल. Bank FD
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर 3.50% ते 7.50% पर्यंतचा व्याजदर मिळत आहे. या बँकेकडून 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना आता सर्वाधिक 7.50% व्याजदर मिळेल. यासोबतच, बँकेने अमृत कलश योजना देखील सुरू केली आहे, ज्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.60% व्याजदर मिळेल. Bank FD
पंजाब आणि सिंध बँक
पंजाब अँड सिंध बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 3.30% ते 7.25% दरम्यान व्याजदर दिला जातो आहे. तसेच, ही बँक ज्येष्ठ नागरिकांना क्युरेटेड एफडी देखील ऑफर करत आहे. या PSB-उत्कर्ष 222 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8.50% व्याज दर मिळेल. याशिवाय अतिशय ज्येष्ठ नागरिकांना PSB-उत्कर्ष 222 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 8.85% व्याजदर मिळेल. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://punjabandsindbank.co.in/content/interestdom
हे पण वाचा :
BSNL च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा डेली 1GB डेटा
Home Loan ची परतफेड लवकरात लवकर करण्याचा मार्ग जाणून घ्या
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर
अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण