सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारमधील सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आज रक्तदान शिबीर भरविले असून आमच्या रक्तातच जनतेची सेवा करणे आहे. ज्या ज्यावेळी महाराष्ट्र, देशात आणीबाणी निर्माण झाली त्या त्यावेळी कर्मचारीच रस्त्यावर आला आणि सरकारला आपलं योगदान दिल आहे. त्यामुळे जुनी पेन्शनबाबत शासनाने लवकरच आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांनी केली.
सातारा येथे शासकीय कर्मचाऱ्यांच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन केले जात आहे. आज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सातारा जिल्हा परिषद समन्वय समितीच्यावतीने पाठींबा दर्शवण्यात आला. यावेळी समितीच्या सदस्यांनी आयोजित भव्य रक्तदान शिबिरास भेट दिली. जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यासह अधिकाऱ्यांनी देखील रक्तदान केले.
आमच्या रक्तातच जनतेची सेवा त्यामुळे सरकारने लवकरच भूमिका जाहीर करावी
शासकीय कर्मचारी आक्रमक : जिल्हा परिषद समन्वय समितीचा पाठींबा pic.twitter.com/gS4PtYmxVR
— santosh gurav (@santosh29590931) March 18, 2023
यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी म्हंटले की, ज्यावेळेस सरकार जनतेच्या विरोधात कर्मचारी आहेत. ते जनतेला वेठीस धरत आहेत असे सांगत आहे. हे सर्व खोटे असून असे काहीही नाही. आमच्या रक्तातच जनतेची सेवा करणे आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे सर कर्मचारी आहेत. आम्ही काय मोठ्या उद्योगपतींची मुले नाहीत. त्यामुळे आम्ही कधीच सामान्य जनतेला वेठीस धरलेले नाही. आम्ही कोरोनासारख्या महामारीतही रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यामुळे शासनाने आम्ही केलेल्या मागणीचा लवकरात लवकर निर्णय द्यावा. सर्व काही पॅटर्न तयार असून शासनाने लवकरच आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कर्मचार्यांच्या संपास ‘आम आदमी’चा पाठिंबा
राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सध्या राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या या संपास आम आदमी पक्षाच्या वतीने पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.