केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Garib Kalyan Yojana चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला

garib kalyan yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Garib Kalyan Yojana : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून देशातील जनतेला एक मोठी भेट देण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर मोफत धान्य योजनेचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर्षी डिसेंबरपर्यंत ही योजना वाढवल्याचे सांगण्यात आले.

हे लक्षात घ्या कि, अन्न मंत्रालयाने मोफत अन्नधान्य योजनेसाठी तीन महिन्यांचा कालावधी प्रस्तावित केला होता. ज्यावर आज चर्चा करण्यात आली. या बैठकी नंतर आता या योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे लक्षात घ्या कि, या योजने अंतर्गत देशातील जवळपास 80 कोटी जनतेला तांदूळ किंवा गहू दिला जातो. मात्र, या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर दर वर्षाला 18 अब्ज डॉलर (सुमारे 1.44 लाख कोटी रुपये) चा अतिरिक्त ताण देखील पडतो आहे. तसेच आता या योजनेची व्याप्ती वाढवल्यानंतर सरकारवरील एकूण भार 44 अब्ज डॉलर (3.5 लाख कोटी रुपये) वाढेल. Garib Kalyan Yojana

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana (PMGKY) | IBEF

या योजने अंतर्गत काय दिले जाते ???

केंद्र सरकारकडून देशातील जनतेला या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ दिला जातो. यासोबतच प्रति व्यक्ती एक किलो या आधारावर हरभरा देखील दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अनुदानाद्वारे लोकांना मोफत रेशन पुरवले जाते. कोरोना काळात गरीबांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. Garib Kalyan Yojana

पीएम गरीब कल्‍याण अन्‍न योजना, गरीबों के लिए वरदान है ये योजना

याआधी देखील वाढवण्यात आली मुदत

ही योजना लागू झाल्यापासून त्यामध्ये दोन वेळा वाढ करण्यात आली ​​आहे. याआधी देखील मार्चमध्ये सरकारकडून या योजनेची मुदत 6 महिन्यांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून मार्च ते 30 सप्टेंबर अशी करण्यात आली. मात्र, ही मुदत संपण्याआधीच या योजनेला पुन्हा एकदा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी, एका रिपोर्टमध्ये सरकारने म्हटले होते की,” भारतीय अन्न महामंडळा (FCI) कडे अन्नधान्याचा तुटवडा नाही. ऑगस्टपर्यंत, FCI कडे 28 लाख टन तांदूळ आणि 26.70 लाख टन गव्हाचा साठा होता. Garib Kalyan Yojana

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana: पीएमजीकेएवाई के तहत 80 करोड़ लाभार्थियों को मिलेगा फायदा – News18 हिंदी

सणासुदीच्या काळात वाढवली व्याप्ती

सणासुदीच्या काळात सरकारने मोफत अन्नधान्याची व्याप्ती वाढवली आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात ही योजना रद्द केल्याचा फटका लोकांना बसू शकेल, असे अनेक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आले होते. यासोबतच येत्या काही महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. Garib Kalyan Yojana

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/pmgky/

हे पण वाचा :

Multibagger Stock : घसरत्या बाजारपेठेतही ‘या’ फुटवेअर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला भरपूर नफा

छोट्या शहरांमधील तरुणांमध्ये वाढतेय Online Dating App ची क्रेझ

‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा

Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा