हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे कि, मोदी सरकार आधार कार्डवर सुलभ कर्ज देत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्याला बळी पडण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा.
हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. कर्ज देण्यासाठी सरकारकडून याआधीच मुद्रा कर्ज योजना सुरू केली गेली आहे. ज्यामध्ये तरुणांना रोजगारासाठी कमी दरात सुलभ कर्ज दिले जात आहे. या व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सरकारने लोकांना सावधगिरीचा इशारा देखील दिला आहे. Aadhar Card
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटले गेले आहे
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांना त्यांच्या Aadhar Card वर 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते या कर्जासाठी अर्ज करू शकतील असेही यात म्हंटले गेले आहे. यापूर्वी देखील एका व्हायरल झालेल्या एका मेसेजमध्ये असा दावा केला जात होता की सरकार बेरोजगार तरुणांना 6,000 रुपये भत्ता देत आहे आणि त्यासाठी नोंदणी देखील सुरू झाली आहे.
सरकारने सांगितले कि …
या व्हायरल झालेल्या पोस्ट मागचे तथ्य तपासल्यानंतर PIB च्या वतीने एक ट्विट करून याबाबतची खरी परिस्थिती स्पष्ट करण्यात आली. हा दावा पूर्णपणे बोगस असून सरकारकडून असे कोणतेही कर्ज दिले जात नाही, असे PIB ने म्हटले आहे. याबरोबरच PIB ने लोकांना अशा प्रकारचे मेसेज शेअर न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. PIB ने म्हटले आहे की, फसवणूक करणारी लोकं अशा प्रकारची फसवणूक करून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात, जेणेकरून त्यांच्या खात्यात प्रवेश करणे सोपे होते. Aadhar Card
It is being claimed that the central government is providing a loan of ₹4,78,000 to all Aadhar card owners#PibFactCheck
▶️ This claim is #fake
▶️ Do not forward such messages
▶️ Never share your personal/financial details with anyone pic.twitter.com/U5gbE3hCLD
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 16, 2022
आधारद्वारे कर्ज उपलब्ध… याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ???
बँकिंग एक्सपर्ट असलेल्या अश्विनी राणा याबाबत सांगतात की, अनेक बँकांकडून Aadhar Card द्वारे पर्सनल लोन दिले जाते. अशा प्रकरणांमध्ये, आधार हे तुमचे प्राथमिक ओळखपत्र मानले जाते. तसेच अशा कर्जासाठी कोणतेही तारण भरावे लागणार नाही. तसेच KYC केल्यानंतर, बँका पगार स्लिप किंवा इतर कागदपत्रांशिवाय आधारद्वारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात. मात्र, कर्ज मिळणे पूर्णपणे तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा CIBIL स्कोअर 700 च्या वर असेल तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवे दर तपासा
Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV
FD Rates : आता ‘ही’ बँक ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज !!!
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा