हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Savings Scheme : केंद्र सरकारकडून लोकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. गुरुवारी केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेचे नवीन व्याजदर जाहीर केले आहेत. यावेळी सरकारकडून 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे.
यानंतर आता पोस्ट ऑफिसमधील 3 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर सध्याच्या 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4% वरून 7.6% करण्यात आला आहे. याच बरोबर आता किसान विकास पत्राच्या कालावधीमध्येही बदल करण्यात आला आहे. सध्या, 7 टक्के व्याजदरासह KVP ची मॅच्युरिटी 123 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी KVP ची मॅच्युरिटी 124 महिन्यांची होती ज्यासाठी 6.9% व्याजदर दिला जात होता. Small Savings Scheme
NCS आणि PPF मध्ये कोणताही बदल नाही
मात्र इथे हे लक्षात घ्या कि, सेव्हिंग डिपॉझिट्स, 1-वर्ष आणि 5-वर्षांच्या FD, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर हे चालू तिमाहीप्रमाणेच राहतील. सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर व्याजदर 6.8 टक्के तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी वर 7.10 टक्के व्याजदर मिळत आहे. Small Savings Scheme
RBI कडून मे महिन्यापासून बेंचमार्क Lending Rates मध्ये 140 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. ज्यामुळे बँकांनी आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढवण्यास प्रवृत्त केले आहे. Small Savings Scheme
उद्या RBI च्या पतधोरण आढाव्याची बैठक
आतापर्यंत अशी घोषणा रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर केली जात होती, मात्र यावेळी सरकारने एक दिवस आधीच ही घोषणा केली आहे. काल (28 सप्टेंबर) सुरु झालेली RBI ची एमपीसी बैठक उद्या (शुक्रवारी) संपणार आहे. उद्या पॉलिसी दरांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. यावेळी कर्जाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे झाल्यास कर्ज महागतील आणि EMI मध्ये वाढ होईल.Small Savings Scheme
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/saving-schemes/know-about-ppf-interest-rate.html
हे पण वाचा :
Bank FD : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकांच्या FD होणार बंद, त्याविषयी जाणून घ्या
Saving Account बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Multibagger Stocks : ‘या’ 3 केमिकल कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 800% रिटर्न !!!
Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!