Government Jobs : महाराष्ट्र शासनाकडून 11 हजार पदांसाठी मेगाभरती होणार; तरुणांना नोकरीची मोठी संधी

Government Jobs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Jobs | राज्यात कोरोना काळापासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तरूण योग्य भरतीची प्रतिक्षा करत आहेत. तर काही तरूण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या सर्वांमागे फक्त एक चांगली नोकरी मिळवण्याचा हेतू आहे. त्यामुळे अशा तरुणांसाठीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आरोग्य विभागांमध्ये 11 हजार रिक्त पदांची भरती (Health Department Recruitment) करण्यात येईल अशी घोषणा सावंत यांनी केली आहे. या घोषणेनंतर तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आरोग्य विभागांकडून ही 11 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामार्फत तरुणांना रोजगार मिळेल. सध्या आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे अनेक समस्या उपस्थित राहत आहेत. मुख्य म्हणजे यामुळे थेट रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या सर्व घटनांना टाळण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी असणे आवश्यक आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्यानंतर व्यवस्थित रित्या कामाची विभागणी केली जाईल. तसेच सर्व भार मोजक्या अधिकाऱ्यांवर येऊन पडणार नाही.

लवकरच 11 हजार पदांची जाहिरात येईल- Government Jobs

अशा सर्व गोष्टींचा विचार करून आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती (Government Jobs) प्रक्रिया वेगवेगळ्या विभागांसाठी केली जाईल या भरतीची जाहिरात लवकरच वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर येईल. त्यामुळे तरुणांनी देखील सतत जाहिराती पाहणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेमुळे तरुणांना रोजगार मिळेल तसेच आरोग्य विभागात कर्मचारी उपलब्ध होतील. यामुळे कामाचा लोड देखील कमी होऊन रुग्णांकडे व्यवस्थित रित्या लक्ष दिले जाईल. आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या घोषणेमुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आता दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात तलाठी परीक्षा सुरू आहेत. तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या परीक्षेनंतर अनेक तरुणांच्या हाती रोजगार येईल. तसेच, यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात देखील घट होण्यास मदत होईल. सध्या राज्यात वाढणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण बघता सरकार वेगवेगळ्या क्षेत्रात भरती प्रक्रिया सुरू करण्याचा विचार करत आहे. आता आरोग्य विभागात करण्यात येणारी भरती प्रक्रिया तरुणांना देण्यात येणाऱ्या नोकरीसाठी उचलले एक पाऊल आहे.