शासनाच्या आदेशामुळे सांगली महापालिकेच्या कामांना ब्रेक, ठेकेदारांचे धाबे दणाणले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । महापालिकेला राज्य शासनाकडून जो निधी देण्यात आला होता यातील ज्या कामांच्या वर्क ऑर्डर अद्याप दिल्या गेल्या नाहीत. त्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने आज काढले आहेत. महापलिकेच्या दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा नियोजन समिती, रस्ते अनुदान यासह विशेष अनुदानातील सुमारे ३५ कोटींच्या कामांना आता ब्रेक लागला असून ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी महापालिकेला विविध योजनांसाठी निधी दिला गेला होता. मात्र आता राज्यात सत्ता बदल होताच निधीला स्थगिती मिळाली आहे. राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व महापलिका, नगरपालिकांना याबाबतचे आदेश बजावले.

यात नगरोत्थान योजनेतील कामांचाही समावेश करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील कामे या आदेशामुळे थांबणार आहेत. त्यात जिल्हा नियोजन समितीकडून नुकतेच महापालिकेला १३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या कामांची मान्यताही झाली आहे. पण अजून निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामांना ब्रेक लागला आहे.

Leave a Comment