Girls Scholarship : सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या स्कॉलरशिप देते? जाणून घ्या

Girls Scholarship
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. आजचा हा दिवस मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, पोषण, पौष्टिक आहार अशा अनेक मुद्यांसंदर्भात जागृतता आणण्यासाठी साजरी केला जातो. आजच्या या दिवशी आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा काही शिष्यवृत्तीची (Girls Scholarship) माहिती देणार आहोत त्याचा शिक्षण घेत असताना मुलींना भरपूर फायदा होईल.

स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती (Girls Scholarship)

स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती सोशल सायन्समध्ये रिसर्चसाठी सिंगल गर्ल चाइल्डला देण्यात येते. ज्या मुली सोशल सायन्स मध्ये पीएचडी करत आहेत, त्यांनाच यूजीसीकडून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत मुलींना पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा 25 हजार रुपये फेलोशिप दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ugc.ac.in/svsgc/ या अधिकृत वेबसाईटवर 40 वर्षाखालील मुली अर्ज करू शकतात.

प्रगती शिष्यवृत्ती

मुलींच्या विकासामध्ये आणखीन भर घालण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून दरवर्षी प्रगती शिष्यवृत्ती (Girls Scholarship) देण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या मुलींना याचा फायदा घेता येतो. तसेच सरकार, मुलींना पदवी शिक्षणादरम्यान वर्षभरासाठी 30 हजार रुपये आणि 10 महिन्यांसाठी 2 हजार देते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी मुलींना AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक असेल. अर्ज करू इच्छिणाऱ्या मुलींनी aicte-india.org वर अर्ज करावा.

इंदिरा गांधी शिष्यवृत्ती

पालकांना एकुलती एक मुलगी असणाऱ्या आणि ज्या मुलींना इयत्ता दहावीत 60 टक्के गुण मिळाले आहेत अशा मुलींना इंदिरा गांधी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत दरमहा 500 रुपये दिले जातील. मुलींना अभ्यासासाठी प्रवृत्त करणे हे या शिष्यवृत्ती मागील उद्दिष्टे आहे.

वुमेन साइंटिस्ट स्कीम

वुमेन साइंटिस्ट स्कीम ही फेलोशिप मुलींच्या टेक्निकल करिअरला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करते. या शिष्यवृत्ती अंतर्गत दरमहा 55000 पर्यंत देण्यात येणार येतात. 27 ते 57 वर्षे असे वयोगट असणाऱ्या महिलांना त्याचा फायदा घेता येऊ शकतो.

बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती

नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक महिलांना मौलाना आझाद शिष्यवृत्ती (Girls Scholarship देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, वर्गात 50% गुण मिळवणाऱ्या मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत महिलांना 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.