सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत करणार वाढ?? देशातील शेतकऱ्यांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 22 जुलै ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू होणार आहे. यामध्ये 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्थसंकल्पातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) रकमेत वाढ करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या संपूर्ण देशभरामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. सध्या या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत केली जात आहे. परंतु आता सरकार ही रक्कम सहा हजारवरून 8 हजार करेल, असे म्हटले जात आहे. कारण या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सतत शेतकऱ्यांकडून देखील करण्यात येत आहे. त्यामुळेच या मागणीला विचारात घेऊन केंद्र सरकार रकमेत वाढ करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील जून महिन्यामध्ये किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला होता. या या हप्त्यात सरकारने देशातील लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती. सध्या देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे रकमेत वाढ करण्याबाबत सरकार देखील विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच सध्या सर्वांचे लक्ष 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.