पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सध्या सातारा दौऱ्यावर असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला. प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

पुस्तकांचे गाव म्हणून भिलार सुप्रसिद्ध-

पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ कि.मि. आंतरावर आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो. गावातील काही घरांनी आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे. अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक वाचकाचे मन प्रसन्न होते.