Coronavirus : कोरोना चाचणी करतानाची भयावह परिस्थिती; कुठे हात पाय बांधून तर कुठे जबरदस्तीने….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये जवळपास 26 शहरांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. सुमारे 21 कोटी लोकसंख्या आपल्या घरातच कैद झाली आहे.

एकीकडे जगभरातील अनेक देश निर्बंध हटवत असताना चीन मोठ्या प्रमाणावर आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करत आहे. यावेळी चीन आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत असून त्यांना जबरदस्तीने पकडून घरातच कोंडून ठेवत आहे. चिनी सरकारने आपल्या आरोग्य यंत्रणेला आठवड्यातून तीन दिवस लोकांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे आणि हे जबरदस्तीने केले जात आहे. सोशल मीडियावर याविषयीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

 होम आइसोलेशन के लिए लोगों के घर उनसे जबरदस्ती छीना जा रहा है. एक वीडियो में पीपीई किट पहने पुलिस को हाउसिंग कॉम्पलेक्स के बाहर लोगों को नए नियम के बारे में बताते देखा गया. इस नियम को सुनने के बाद लोगों को चीखते-चिल्लाते देखा गया.

अनेक ठिकाणी होम आयसोलेशनसाठी लोकांची घरे जबरदस्तीने हिसकावून घेतली जात आहेत. एका फोटोमध्ये, पीपीई किट घातलेले पोलिस हाउसिंग कॉम्पलेक्सबाहेर लोकांना नवीन नियमाबद्दल माहिती देत असल्याचे दिसून येते. शांघाय आणि इतर शहरांमधूनही असे अनेक फोटो समोर येत आहेत, जे याची पुष्टी करतात. अनेक फोटोंमध्ये चिनी आरोग्य कर्मचारी जबरदस्तीने लोकांची कोविड (Coronavirus) चाचणी करत असल्याचे दिसून येतात. कोविड चाचणीसाठी पोलीस लोकांना मारहाण करतानाही दिसून आले. यासोबतच लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी घरांची दारे वेल्डिंगद्वारे बंद केली जात आहे.

 झिजिंगयान, जिलिन, शंघाई, बीजिंग समेत 8 प्रांतों में लगभग दो महीने से स्कूल बंद हैं. यहां ओमिक्रॉन वायरस के कारण संक्रमण के केस कम नहीं हो रहे हैं. जिनपिंग सरकार ने इन प्रांतों के स्कूलों में पढ़ने वाले प्राइमरी के बच्चों की कोरोना वायरस टेस्टिंग के आदेश दिए हैं. बच्चों को घरों से लाकर जांच हो रही है.

भारतात आज गेल्या 24 तासात 3,805 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली असून, त्यासोबतच एकूण रुग्णांची संख्या 4,30,98,743 वर पोहोचली आहे. देशात 22 कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,24,024 झाली आहे. 3,000 हून जास्त लोकं कोरोनाव्हायरसमधून बरे झाले आहेत, ज्यामुळे देशातील एकूण कोविड (Coronavirus) रिकव्हरीची संख्या 4,25,54,416 झाली आहे.

हे ही वाचा  Lockdown : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार! लोकांना पाण्याचा घोट मिळणंही झालंय कठीण