Govinda : गोविंदाने लॉन्च केला स्वतःचा OTT ॲप; सब्सक्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) नव्वदीच्या काळापासून आतापर्यंत आपलं क्रेझ कायम ठेवलं आहे. त्याची डान्स करण्याची अनोखी शैली लाखो प्रेक्षकांना भुरळ घालते. बरेच कलाकार गोविंदाला फॉलो सुद्धा करतात. त्यामुळे बॉलिवूड सिनेविश्वात गोविंदा या नावाचं चांगलंच वजन आहे. गेल्या काही काळात गोविंदाने कोणतेही सिनेमे केलेले नसले तरीही त्याच फॅन फॉलोईंग काही कमी झालेलं नाही हे खरं. अशातच आता गोविंदाने डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दुनियेत एंट्री केली आहे.

गोविंदाने सुरु केला स्वतःचा OTT ॲप (Govinda)

अभिनेता गोविंदाने नुकताच स्वतःचा मालकी हक्काचा डिजिटल ओटीटी ॲप सुरु केला आहे. याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर गोविंदाने त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.

गोविंदाच्या या नव्या ओटिटी ॲपचे नाव ‘फिल्मी लट्टू’ असे आहे आणि याबाबत अभिनेत्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. तसेच या ॲप्लिकेशनचे सब्स्क्रिप्शन किती रुपयाला मिळणार? याबाबत देखील त्याने माहिती दिली आहे.

गोविंदाची इंस्टाग्राम पोस्ट

अभिनेता गोविंदाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती दिली आहे.



या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘माझा ओटीटी ॲप लट्टू फिल्मी सादर करत आहे. आता डाउनलोड करा. या एंटरटेनमेंट ॲपवर तुम्हाला खूप काही मिळणार आहे. हा ॲप डाऊनलोड करा आणि माझा ”आ गया हिरो” हा सिनेमा पहा’. ही पोस्ट शेअर करताना गोविंदाने या अॅप्लिकेशनचे सब्सक्रिप्शन केवळ १४९ रुपयांना मिळणार असल्याचे सांगितले आहे.

गोविंदाची जबरदस्त कारकीर्द

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने १९८६ साली ‘इलजाम’ नावाच्या सिनेमातून बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. यानंतर त्याने एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले. त्याचे बरेच सिनेमे एव्हरग्रीन आहेत. (Govinda) यामध्ये ‘लव्ह 86’, ‘हत्या’, ‘राजा बाबू’, ‘शोला और शबनम’, ‘कुली नंबर १’, ‘हीरो नंबर १’, ‘आंटी नंबर १’, ‘दुल्हे राजा’, ‘भागम भाग’, ‘हम’, ‘बनारसी बाबू’ असे जबरदस्त सिनेमांच्या नावाचा समावेश आहे.