सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. याबाबतचा गंभीर विचार करून राज्य सरकारने मालिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासह अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य केळकर म्हणाल्या,”अल्पसंख्यांक मंत्री मलिक यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात जणू काही मंत्र्यांच्या मध्ये चढाओढच लागली आहे. हे सरकार काय दाऊद च्या पाठिंब्यावर चालले आहे काय?” असा प्रश्नही निर्माण होत आहे. 2017 पासून चालू असलेल्या ईडीच्या चौकशीमध्ये संयुक्त चौकशी ANI द्वारे तपासात कुरल्याची दाऊदची जमीन बेकायदेशीर रित्या बळकावली.
“गेले वीस वर्ष त्याचा वापर करणे हे देश भक्तीचे लक्षण आहे का? या सगळ्या प्रकरणात नवाब मलिकांनी थोडी तरी लाज शिल्लक असेल तर तातडीने राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याप्रमाणेच न्याय या मंत्र्याला दिला पाहिजे. आघाडीच्या मंत्री यांचा कारभार तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाईल,”असा इशाराही केळकर यांनी यावेळी दिला.