नाशिक : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचे निकाल (Gram Panchayat Elections) आज जाहीर झाले आहेत. या निकालानंतर (Gram Panchayat Elections) नाशिकमध्ये भाजपआणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत. यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका (Gram Panchayat Elections) पार पडल्या तर दोन ग्रांमपंचायतीचे निकाल बिनविरोध झाले. या तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर अपक्ष, 23 ठिकाणी राष्ट्रवादी, 17 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, 1 ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला आहे.
राज्यातील 1166 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections) 16 ऑक्टोबरला मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार आज 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी पार पडली.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!