दिलासादायक! पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार; निवडणूक आयोगाचे नवीन आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना सर्वर डाऊन व कनेक्टिव्हिटी येत नसल्याने मागील दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार केंद्रप्रमुख यांची झोप उडाली होती. महाईसेवा केंद्रांच्या समोर रात्रभर जागे राहूनही ऑनलाइन अर्ज भरताना येत नव्हते. त्यातच बुधवार 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने निर्धारित वेळत अर्ज दाखल करता येणार की नाही अशी शंका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु सर्वच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता यावेत म्हणून निवडणूक आयोगाने आदेश काढत पारंपरिक पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे सांगितले असून ३० डिसेंबर रोजी अर्ज स्वीकृती साठी वेळ वाढवून देण्यात आला आहे.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या २३ डिसेंबर तारखेपासून ३ लाख ३२ हजार ८४४ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. यावेळी २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ.तक्रारी निवडणुक आयोगाकडे गेल्या होत्या.

सदर बाब विचारात घेता , इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहुन नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी असे म्हणत आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारण्याचा आदेश काढला आहे. सोबतच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील बुधवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा . पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये आरओ लॉगईन मधून भरुन घेण्याची सुचनाही करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment