Work From Home करता करता थोडं Work For Village केलं अन् आज ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नवीन पिढीने राजकारणात सहभाग घ्यायला पाहिजे, तरुण हेच देशाचे भविष्य भवितव्य ठरवतील, अशा प्रकारचे वाक्य चौकाचौकात ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात तरुणांचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो. पण अशाच पिढी नी पार राजकारणामध्ये गावचे ‘ कोरस् गावचे उदाहरण हे एक वेगळेपण ठरवत आहे. या गावातील तरुणांनी पिढी नी … Read more

नावाजलेले आदर्शग्राम हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शग्राम हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत. हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होते आहे. विशेष म्हणजे पोपटराव पवार यांनाही निवडणुकीला सामोरे जावं लागतं आहे. एक शिक्षक त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. पद्मश्री पोपटराव … Read more

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्यांची आता खैर नाही! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ कडक आदेश

मुंबई । राज्यात काही ठिकाणी होत असलेल्या सरपंचपदाच्या लिलावाबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानं कडक पाऊल उचललं आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली … Read more

दिलासादायक! पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार; निवडणूक आयोगाचे नवीन आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना सर्वर डाऊन व कनेक्टिव्हिटी येत नसल्याने मागील दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार केंद्रप्रमुख यांची झोप उडाली होती. महाईसेवा केंद्रांच्या समोर रात्रभर जागे राहूनही ऑनलाइन अर्ज भरताना येत नव्हते. त्यातच बुधवार 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने निर्धारित वेळत अर्ज दाखल … Read more

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांना दिलासा; आता जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑफलाईनही स्वीकारले जाणार

मुंबई । राज्यात  होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी … Read more

ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत कोरोनाची एन्ट्री; अमरावती जिल्ह्यात ३७ उमेदवार, 13 निवडणूक कर्मचारी पॉझिटिव्ह

अमरावती । राज्यात 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat elections 2021) होऊ घातल्या आहेत. त्यामुळं राज्यातील गावखेड्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. अशावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यातून (Amravati) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण ३७ उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर 13 निवडणूक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह … Read more

लोकशाहीचा बाजार! नाशिक जिल्ह्यात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली

नाशिक । राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्यात नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला … Read more

मुक्ताईनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाई; रक्षा खडसे-एकनाथ खडसे यांच्यात ‘टफ फाईट’

जळगाव । भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचं वचन शरद पवारांना दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूक घेऊ घातल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीला गावखेड्यात पोहचवण्याचे वचन पूर्ण करण्याची नामी संधी नाथाभाऊंकडे यानिमित्ताने आहे. मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला. मात्र, नाथाभाऊंची सुनबाई खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) अजूनही हातातलं … Read more

ग्रामपंचायत उमेदवारांना ‘ही’ अट आली आडवी; अनेकांचा पत्ता झाला कट, तर बाकींची अर्ज भरताना होतेय दमछाक

मुंबई । (Gram Panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं असली तरी ग्रामपंचायती रिंगणात इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 वी पासची टाकण्यात आलेली अट, उमेदवारी अर्ज भरण्यात सलग तीन सुट्ट्यांनी घातलेला खो आणि ऑनलाईन अर्ज भरताना काही ठिकाणी येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्या जीआरमुळे इच्छुकांचा … Read more

सरपंचचं निवडणुकीनंतर ठरणार, तर पॅनलचा खर्च कुणी करायचा? गावपुढारी पडले पेचात

औरंगाबाद । राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळं गावाचं सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनी असलेल्या अनेकांनी आपापल्या गावात मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारच्या एका परिपत्रकांन पाणी फिरवलंय. (Sarpanch Candidate) कारण सरपंचपदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा असा … Read more