Grampanchayat Election Results 2022 : सातारा जिल्ह्यात कोणत्या गावात कोणाची सत्ता? पहा LIVE Update

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. Grampanchayat Election Results 2022 निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा उडाला असून रविवारी सर्वत्र चुरशीने मतदान झाले. आता प्रत्यक्ष मतमोजणी होणार असून निवडणुकीत कोण बाजी मारेल हे स्पष्ट होणार आहे. या लाईव्ह अपडेटमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल लाईव्ह पाहू शकता. लेटेस्ट अपडेट करता तुमचे पेज रिफ्रेश करा. https://hellomaharashtra.in/grampanchayat-election-result-2022-karad-taluka/

  • आटके ग्रामपंचायतीत 35 वर्षानंतर सत्तांतर महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला धक्का
  • तळबीड ग्रामपंचायतीत सत्तांतर राष्ट्रवादी ला धक्का राष्ट्रीय कॉग्रेसची सत्ता
  • वडगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर भाजपा ची सत्ता कॉग्रेसला धक्का
  • रेठरे खुर्द ग्रामपंचायत कराड तालुक्यातील रेठरे खुर्द ग्रामपंचायत राष्ट्रवादीने सत्ता तर सरपंच पदावर काँग्रेसने बाजी मारली आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाच्या सुनिता बापूसाहेब साळुंखे यांनी लोकनियुक्त सरपंच पदावर विजय मिळवला आहे.
  • दुशेरे, आणे – भाजपाच्या डॉ अतुल भोसले यांची
  • सुपनेत सत्तांतर, पालकमंत्री व उंडाळकर गटाला धक्का प्रकाश पाटील यांना धक्का
  • कुसूर ग्रामपंचायती कुसूर ग्रामपंचायतीत डॉ. अतुल भोसले व अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाने दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली.
  • हिंगनोळी /हेळगाव पाडळी/अंतवडी – राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम
  • पश्चिम सुपने – राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच, दोन सदस्य विजयी रयत आघाडी चार सदस्य विजय समसमान मतामुळे चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर होणार थोड्याच वेळात
  • किवळ ग्रामपंचायत सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 12/0 विरोधी भाजपा आणि शिंदे गट पराभूत
  • अंतवडी ग्रामपंचायतीत  सत्तांतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय
  • तारुख ग्रामपंचायतीत अपक्ष सरपंच विजयी, भाजपा आणि कॉग्रेस ला धक्का अपक्ष सरपंच उमेदवार विजयी अपक्ष सचिन कुराडे विजयी
  • घोलपवाडी ग्रामपंचायत महाविकास आघाडी कडे
  • चोरजवाडी ग्रामपंचायत तटस्थ गटाकडे
  • वनवासमाची ग्रामपंचायत स्थानिक आघाडीकडे
  • किवळ ग्रामपंचायत सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 12/0 विरोधी भाजपा आणि शिंदे गट पराभूत
  • मनव /येळगाव राष्ट्रीय काँग्रेस उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम
  • चरेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी सत्ता कायम पतंगराव माने गटाचे 10, तर सुरेश माने गटाचे 3 विजयी सरपंच देवदत्त माने विजयी
  • जुने कवठेत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना धक्का राष्ट्रवादी काँग्रेसची 20 वर्षाची सत्ता उलथवून काँग्रेसची बाजी
  • क्षेत्र माहुली ग्रामपंचायत कोरेगाव मतदासंघात आमदार शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का महेश शिंदे गटानं क्षेत्र माहुली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातुन हिसकावली एकनाथ शिंदे गटानं क्षेत्र माहुलीत झेंडा फडकावला महेश शिंदेच्या विचाराचा सरपंच १६६ मतांनी विजयी १४ पैकी ११ जागांवर आमदार महेश शिंदें गटाचे उमेदवार विज
  • भुईज ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता भाजपाच्या मदन भोसले गटाला १० जागा मिळाल्या असुन सरपंच सुद्धा त्यांच्याच गटाचा निवडुन आला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाला ६ जागांवर समाधान मानावं लागलय

फलटण तालुका
एकूण 24
रामराजे गट राष्ट्रवादी :-20
भाजप -02
पाटील पॅनेल -01
सह्याद्री कदम-01

कराड तालुका
एकूण 44 ग्रामपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेस- 13
राष्ट्रीय काँग्रेस-15
भाजपा -8
शिवसेना शिंदे गट- 0
शिवसेना ठाकरे गट-0
तटस्थ(other)- 8

महाबळेश्वर तालुका
एकूण ग्रामपंचायत:- 6
राष्ट्रवादी काँग्रेस- 0
राष्ट्रीय काँग्रेस-0
भाजपा -0
शिवसेना शिंदे गट- 5
शिवसेना ठाकरे गट-1 तटस्थ(other)- 0