संतापजनक ! आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) केला आहे. हि संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन नातीवर अजून दोघांनी अत्याचार (Rape) केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आजोबांसोबत अन्य दोघांनाही अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास देवराम तुमसरे, यशवंत तातोबा कमाने, अनिल रमेश सेलोकर असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा नराधम आजोबा अत्याचार (Rape) करत होता. पीडित मुलगी 11 वर्षाची असताना तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार करण्यात आला होता.

काय घडले होते ?
2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केले. त्यानंतर नराधम आरोपीने या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी दिली. यामुळे घाबरून पीडितेने या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. त्यामुळे आरोपीची आणखी हिम्मत वाढली आणि त्याने आणखी तीन वेळा पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.

काकानेही केला अत्याचार
सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही पिडीतेसोबत केला. मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार (Rape) असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हे पण वाचा :

म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल

Leave a Comment