IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडिया एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. या सीरिजसाठी (IND vs ENG) चेतेश्वर पुजाराचे पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक झालं आहे. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात (IND vs ENG) आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी केल्यानंतर पुजाराला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमधून बाहेर करण्यात आलं होते. मात्र त्याने नुकत्याच झालेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याला पुन्हा टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने 7 इनिंगमध्ये त्याने 143.4 च्या सरासरीने 717 रन केले, यात त्याच्या नावावर दोन द्विशतकं आणि 4 शतकं होती. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी हे तिन्ही खेळाडू तयार असणार आहेत. 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) एकमेव टेस्ट मॅच होणार आहे. मागच्या वर्षी न झालेल्या सीरिजची ही अखेरची मॅच आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटची टेस्ट स्थगित करण्यात आली होती. या सिरीजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.

इंग्लंड टेस्टसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment