कमाईची मोठी संधी ! ‘या’ सरकारी बँकेत गुंतवा पैसे, पुढच्या 6 महिन्यांत तुम्हाला मिळेल 60% पेक्षा जास्त रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) च्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला सरकारी बँकांमध्ये (PSU Banks) गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. आपण बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता. या बँकेतील गुंतवणूकीवर तुम्हाला पुढच्या 6 ते 1 वर्षात 60 टक्के रिटर्न मिळू शकेल. याची माहिती एका रिसर्च रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. सामान्यत: असे मानले जाते की, सरकारी कंपन्या आणि बँका नियमांनुसार चालतात. यामुळेच अशा ठिकाणी पैशांची गुंतवणूक करण्यात गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते.

शेअर्समध्ये 60 टक्क्यांची वाढ दिसून येईल
विदेशी ब्रोकरेज फर्म CLSA चा असा विश्वास आहे कि, पुढील 6 ते 12 महिन्यांत या बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. बँकेचे कॉर्पोरेट क्रेडिट सायकल बदलत आहे आणि अलीकडील भांडवल उभारणीमुळे बँकेकडे पुरेसे भांडवल आहे. या व्यतिरिक्त कोरोना कालावधीत बँकेची रीटेल एसेट क्वालिटी बळकट झाली आहे.

ब्रोकरेज फर्म CLSA ने असे म्हटले आहे की,” बँक ऑफ बडोदाचे सध्याचे मूल्यांकन 0.55 पट आहे.ब्रोकरेज फर्म CLSA ने बँक ऑफ बडोदाच्या उत्पन्नाचा अंदाज 4 ते 5 टक्क्यांनी वाढविला आहे. CLSA ने BoB च्या शेअर्सचे प्राइस टार्गेट 125 रुपयांवरून 130 रुपये केले, मंगळवारी बँक ऑफ बडोदाचा शेअर 81.20 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment