विशेष लेख | अन्वय गायकवाड
‘मसाल्याचे किंग’ म्हणून ओळखले जाणारे धर्मपाल गुलाटी यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. एकेकाळी टांगा चालवत अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांनी या व्यवसायची सुरुवात केली आणि आज MDH मसाला कंपनी एक ब्रँड म्हणून सर्वदूर त्यांनी पोहचवली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. MDH चा अर्थ म्हणजे ‘महाशयान दि हट्टी’.
आता जाणून घेऊयात महाशय धरमपाल गुलाटी कसे बनले मसाल्यांचे किंग?
धरमपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानात झाला. 1947 साली भारताची फाळणी झाली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला भारतात यावं लागलं. भारतात आल्यावर करायला काही नव्हत आणि पुढे जगायचं कसं हा प्रश्न समोर होता. दिल्लीसारख्या नव्या शहरात जगायचं म्हणजे काही तरी करण गरजेचं होत म्हणून हा तरूण विचारत पडला. हातामध्ये फक्त 1500 रुपये घेऊन तो भारतात आला होता. याच विचारात तो चांदनी चौकात गेला आणि तिथं 650 रुपयांना टांगा विकत घेतला. ‘करोलबाग दोन आना’, ‘करोलबाग दोन आना’ असं इतर टांगेवाल्यांसारखं ओरडून ओरडूनही त्याला गिर्हाइक मिळत नव्हत, शेवटी टांगा देऊन टाकावा लागला.
टांगा चालला नाही म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सियालकोटचे मसाले मिळतील असं जाहीर करून टाकलं(सियालकोटचे देगी मिर्च मसालेवाले धर्मपाल गुलाटी हे पाकिस्तानात फेमस होते आणि ते दिल्लीत व्यवसाय करत असल्याचं लोकांना जेव्हा कळलं तेव्हा ग्राहकांनी हे मसाले घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली). नंतर एक लाकडी दुकानातून ते मसाले विकू लागले. काही काळानंतर खारी बावलीमध्ये त्यांचं दुकान सुरू झालं.एक दुकान ‘गफ्फार मार्केट’मध्येही सुरू झालं.
ते दिवसातले 12 -15 तास ते काम करू लागले. खारी बावलीमध्ये जम बसल्यावर दिल्लीच्या इतर भागांमध्येही त्यांची दुकानं झाली. आज त्यांचा व्यवसाय 1000 कोटींच्या वर गेला आहे. देशातल्या कंपन्यांच्या सीईओंमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी ते होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव ‘टांगेवाला कैसे बना मसालोंका शहेनशाह?’ असं ठेवलंय.
थोडी माहिती टर्नओव्हर बद्दल जाणून घेऊयात.
१५०० रुपयात सुरू झालेला हा व्यवसाय होता.आणि आता तो कोटींच्या घरात पोहचला आहे. त्यांच्या १५ वेगवेगळ्या मसाल्यांच्या कंपन्या आहेत आणि ६० च्या वरती वेगवेगळ्या देशांत त्यांचे प्रॉडक्ट विकले जातात.
अन्वय गायकवाड