Wednesday, October 5, 2022

Buy now

बिहारमध्ये राजकीय भुकंप!! नितीशकुमार सरकार कोसळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

नितीशकुमार यांच्या राज्यपालांच्या भेटीपूर्वी भाजपच्या 16 मंत्र्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्रही भाजपच्या 16 मंत्र्यांनी दिले राज्यपालांना दिले आहे. त्यांच्यानंतर नितीशकुमार यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. उद्या ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार एका महिन्यापासून भाजपपासून अंतर ठेऊन होते. दरम्यान त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केले. त्यामुळे नितीश कुमार यांनी आज भाजपशी काडीमोड घेतला आहे. तसेच बिहारमध्ये 11 ऑगस्टपूर्वी नितीशकुमार पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करणार आहेत.

चिराग मॉडेलचा उधळला डाव –

बिहार राज्यात चिराग मॉडेल होणार असल्याचे जेडीयूकडून सांगण्यात आले होते. कारण त्यांना आरसीपी सिंह यांच्या भाजपसोबत होणाऱ्या हालचालीबाबत माहिती मिळाली होती. यावरून वरून जेडीयूकडून शक्यता वर्तवण्यात आली होती. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेलद्वारे भाजपने जेडीयूला 43 जागांवर रोखले होते. त्यानंतर आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून दुसरे चिराग मॉडेल घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता. नितीश कुमार यांना एकट पाडण्याची ही खेळी होती. मात्र, नितीश कुमार यांनी ही खेळी उलथवून लावली आहे.