हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मुलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीला जिद्द आणि कृतीची जोड दिल्यास जीवनात अशी कोणतीच गोष्ट नाही कि ती तुम्ही साध्य करू शकत नाही. हे केरळ मधील १७ वर्षाच्या मुलांनी दाखवून दिले आहे. हि तिन्ही मुलं यावर्षी बारावीला आहेत . दहावीत असताना त्यांच्याबरोबर एक घटना घडली . हे तिन्ही मित्र एकत्र गेम खेळत असताना त्यांच्याबरोबर असललेला चौथा मित्र मात्र गेम खेळू शकत नव्हता. तो लहानपणापासूनच अंध असल्याने कॉम्प्युटर वर गेम खेळणे त्याला जमत नव्हते. हे तिघे मिळून त्या गेम चा आंनद लुटायचे परंतु त्या मित्राला आनंद लुटता येत नव्हते याच त्यांना नेहमी दुःख वाटायचे. आणि तेथून त्यांनी एक असा गेम बनवायचं कि जो गेम अंध मुलं खेळू शकतील. आणि तो त्यांना वापरायला सोपा असेल तसेच त्याची किंमत हि कमी असेल. असा विचार केला. त्यानंतर ते गेम बनवण्याच्या बाबतीत फार सिरीयस झाले.
यशोवर्धन कोठारी, ध्रुव जव्हारी आणि देव कपाशी अशी या तिघांची नावे आहेत. ध्रुवाचा मोठा भाऊ मोक्ष हा अंध आहे . त्याला आपल्यासोबत खेळता येत नाही कि एन्जॉय करता येत नाही. आपण सर्वानी मिळून जर अंध मुलांसाठी गेम बनवला तर …. अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली भारतात अंध मुलांसाठी खूप कमी गेम आहेत परंतु त्याच प्रमाणात बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात अंध मुलांसाठी गेम आहेत . परंतु त्याचा उपयोग भारतीय मुलांना होणार नाही कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोडिंग वापरले आहे. मोक्ष कडे तरी काही प्रमाणात गेम आहेत परंतु इतर अंध मुलांकडे गेम नसतील . या एका प्रश्नाने त्याच्या या प्रवासाला सुरुवात झाली.
यशोधन सांगतो कि,” आम्ही हा गेम बनवायचा निर्णय घेतला होता. पण हे सत्यात उतरवण फ़ार कठीण होत. असं गेम बनवायचा कि जो अंधांना खेळता येत तसेच त्याचे पोर्टेबल सिस्टीम कमी असेल . खेळताना तो रंजक वाढला पाहिजे आणि तो स्वस्त हि असला पाहिजे खेळताना पण एकटे खेळतोय असं वाट्याला नको फार बटन नसलेला आणि ज्याची रचना गुंतागुंतीची नसलेला आणि तो फिजिकली खेळता येऊ शकतो.असा निर्णय घेतला. आणि मग आम्ही इलेकट्रोनिक बेस असललेला कॉम्पुटर गेम बनवायचा विचार केला. त्यानुसार हा गेम “कोण बनेगा क्विझ बेस” या धर्तीवर आधारित हा गेम आहे. पायथॉन हि कॉम्पुटर लँग्वेज वापरून आणि जनरल नॉलेज चा वापर करून हा गेम बनवला आहे.
देव कापशी म्हणतो कि , आम्ही तीन गोष्टींवर काम करायचं असा विचार केला होता. एक म्हणजे साइज , दुसरं प्राईज आणि तिसरं म्हणजे हा गेम सिम्पल असावा म्हणजे सिम्पलीसिटी या गोष्टींवर जास्त भर दिला. असं करत असताना आम्ही अनेक अंध शाळेंमध्ये भेटी दिल्या त्यांच्याकडे असलेल्या गेम्स ची माहिती घेतली त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. आणि मग गेम रन करण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी दीड वर्ष या गेमवर झपाटल्यासारखे काम केले. गेम बनवणे, कोडिंग डेटा बेस तयार करणे, ट्रायल घेणे अश्या अनेक गोष्टी वारंवार कराव्या लागत होत्या.
अभ्यास सांभाळून हे कस गेलं असं विचारलं असता देव म्हणाला कि, त्या काळात आम्ही खूप वाचन केलं ब्रेन स्टोर्मिंग केलं मार्केट मध्ये गेलो. . काय नावीन आलंय याचा अभ्यास केला त्यानुसार दिशा ठरवत गेलो. नवनवीन चॅलेंज घेत गेलो , कोडिंग करणे , त्याच स्केच बनवणं , डाटाबेस ट्रायल आणि एरर वापरत आम्ही यश प्राप्त केलं.
हि तिन्ही मुले गेम बाजारात आणण्यासाठी धडपडत आहेत. अंध मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेला हा गेम आम्ही डोनेट करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. ” व्हिजन बेयोंड ” हा गेम तयार केला आहे. हा गेम एकत्र चार ते पाच जण खेळू शकतात. . पुढे पुढे जास्त हा गेम रोमंचाक बनत जातो नवीन पॉईंट मिळत जातात. हा गेम संवादी आहे कारण अजूनही काही अंध मुलांना ब्रेल भाषा येत नाही त्यामुळे भाषा न येणाऱ्या लाही हा गेम खेळता यावा अशी रचना आहे.