स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. कराड येथे नाना पाटेकर यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्या अगोदर आपण यशवंतरा चव्हाण यांना अभिवादन करण्यास जाणार असल्याचे नानांनी संयोजकांना सांगितले.

समाधीस्थळी नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर, सुधीर चिवटे, गणेश थोरात, कॅप्टन आशा शिंदे, प्रविण पाटील आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अनेक राजकीय नेते अभिवादनास येत असतात. परंतु सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हजेरीला एक वेगळे महत्व आहे. कारण सिनेसृष्टीतील लोक या समाधीकडे फारसे फिरकताना दिसत नाहीत.  नाना पाटेकर हे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व समाधीस्थळी हे तशी मोठी गोष्ट आहे. नाना पाटेकर हे अभ्यासू जाणकार व्यक्तिमत्व आहे.

यावेळी नाना पाटेकर आपल्या नेहमीच्या साध्या वेशात व पोशाखात पहायला मिळाले. साधा पॅन्ट, लेंगा अन् अंगावर टाॅवेल पहायला मिळाला. नाना पाटेकर प्रितीसंगम घाटावर आल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. समाधीस्थळाचे कृष्णा- कोयना संगम व समाधीस्थळ पाऊन फारच सुंदर अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली.