गांगुली स्वार्थी होता, संघात फक्त माझंच ऐकावं अशी त्याची वृत्ती होती; ग्रेग चॅपलचे गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. याच वादावरून सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पायउतार देखील व्हावं लागलं होतं. आता ग्रेग चॅपल यांनी पुन्हा एकदा गांगुली वर काही गंभीर आरोप केले आहेत. गांगुली हा मेहनती नव्हता. खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त कॅप्टन्सीविषयी मतलब होता, असे सनसनाटी आरोप ग्रेग चॅपेल यांनी केले आहेत.

गांगुली हा केवळ स्वार्थी होता. संघात फक्त माझं ऐकावं अशी त्याची वृत्ती होती. संघातील खेळाडूंविषयी त्याला देणंघेणं नव्हतं. त्याच्या खेळाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याच्या खेळात सुधारणा व्हाव्यात, असं त्याला कधीच वाटायचं नाही. केवळ मी कर्णधार असावा, एवढंच त्याला वाटायचं, असे सनसनाटी आरोप करत ग्रेग चॅपेल यांनी गांगुली वर आरोप केले आहेत.

राहुल द्रविडची तोंड भरून स्तुती –

राहुल द्रविड खूप चांगला कर्णधार होता. द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्षभर चांगली कामगिरी केली होती. त्याला भारताचा संघ जगातील टॉप संघ व्हावा, असं वाटायचं.त्यासाठी तो प्रयत्नशील असायचा, अशा शब्दात चॅपेल यांनी राहुल द्रविडचं कौतुक केलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.