तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्यावर गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या पुणे गुन्हेगारीमध्ये पुढे आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री फायरिंगची (firing) घटना घडली आहे. या घटनेत पूर्ववैमान्यातून दोन गटात राडा झाला तसेच गोळीबारदेखील करण्यात आला. हि संपूर्ण गोळीबाराची (firing) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये काही आरोपी तरुणाला जबर मारहाण करताना दिसत आहेत. सुरुवातीला ते त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. यानंतर यातील एक आरोपी बंदूक बाहेर काढतो आणि हवेत गोळीबार (firing) करतो. यानंतर सगळे मिळून त्या तरुणाला बेदम मारहाण करतात. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणीच ही धक्कादायक घटना घडली आहे.

या आरोपींपैकी सोन्या दोडमणी याने त्याचेकडील कमरेला लावलेली बंदूक काढून त्यातून हवेत गोळीबार (firing) केला. पीडित तरुणाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने 7 ते 8 वेळा तरुणाच्या तोंडावर हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याला जखमी केले आणि त्यानंतर आरोपी घटनास्थवरून पसार झाले. यानंतर काहीवेळाने पुन्हा एक आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने जखमी तरुणावर दगडाने वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..