हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cryptocurrency : गेल्या काही महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीसह सर्व डिजिटल ऍसेट्स जीएसटीच्या कक्षेत आणणार असल्याची चर्चा सुरू होती. असे म्हंटले जात होते कि, सरकार कडून क्रिप्टोकरन्सीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येईल. ज्यावर जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल. मात्र, चंदीगड येथे झालेल्या 47 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की,” जीएसटी परिषदेच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सी बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.” यावरूनच सध्या Cryptocurrency जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचे कळून येते.
पुढील बैठक ऑगस्टमध्ये होणार
जीएसटी कौन्सिलची 47 वी बैठक संपल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटले की,”आता जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल. यामध्ये मर्यादित अजेंडा ठेवण्यात येणार असून त्यावर चर्चा केली जाणार आहे.” अर्थमंत्र्यांच्या या विधानाकडे लक्ष दिले तर यावरून असे दिसून येते की, Cryptocurrency वर जीएसटी लागू करण्याबाबत पुढील बैठकीत चर्चा होणे अवघड आहे.
अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आला टॅक्स
फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांकडून Cryptocurrency च्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आणि प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के TDS लादण्याची घोषणा केली गेली होती. त्यामुळे सरकार क्रिप्टोकरन्सीला मान्यता देणार असे म्हंटले जात होते. मात्र, आजतागायत सरकारकडून याबाबत कोणतेही धोरण तयार केले गेलेले नाही. हे लक्षात घ्या की, क्रिप्टोकरन्सीवरील हे टॅक्स रेट 1 जुलैपासून लागू होतील.
संसदेत विधेयक आणण्याचा विचार
दीर्घकाळापासून सरकार Cryptocurrency बाबत संसदेत विधेयक आणण्याचा विचार करत आहे. मात्र, प्रत्येक अधिवेशनात कोणत्या ना कोणत्या कारणाने ते पुढे ढकलले जात आहे. आणि आता जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतही याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. यावरूनच सरकारला क्रिप्टोचे रेग्युलेशन करण्याची घाई नसल्याचे दिसून येते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/PressReleases.aspx?Id=2522
हे पण वाचा :
Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या
आता नॉन-ब्रँडेड तांदूळ अन् मैद्यावरही द्यावा लागणार 5 टक्के GST
Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!