जीएसटीच्या राज्य कर अधिकाऱ्यांसह दोघांना अटक; करातील त्रुटी दूर करण्यासाठी मागितली ७० हजारांची लाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत याच्यासह कर सहायक शिवाजी महादेव कांबळे या दोघांना चाळीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. सांगली-मिरज रस्त्यावरील जीएसटी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाने ही कारवाई केली. मुल्यवर्धीत करातील त्रुटी दूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, जीएसटी विभागात प्रथमच ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीचे कवठेमहांकाळ येथे बसवेश्वर इंडस्ट्रीज आहे. त्याठिकाणी फर्निचर तयार केले जाते. या कारखान्याचा मागील तीन वर्षाचा मुल्यवर्धीत कर मार्च 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरलेला होता. जीएसटी कार्यालयातील राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे यांनी तक्रारदार यांना फोन लावला. मुल्य वर्धीत करात त्रुटी निघण्याची शक्यता आहे. तुम्ही एक लाख रूपये द्या, म्हणजे तुमच्या करामध्ये आम्ही त्रुटी काढणार नाही, असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटी विभागात सापळा रचला.

राजेंद्र खोत यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम शिवाजी कांबळे याच्याकडे देण्यास सांगितले. शिवाजी कांबळे याने चाळीस हजार रूपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.