औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत.
सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे.
जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 924 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 91 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येईल. असे तज्ञांचे मत आहे. ही कोरोना महामारीची परिस्थिती सोडवण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून मनपाने आता कोरोनाच्या चाचण्यामध्ये वाढ केली असून दररोज दोन हजार जणांच्या चाचण्या करण्यात येत आहे. मागील 5 दिवसात कोरोनाच्या 8 हजार 908 करण्यात आल्या आहे. यामध्ये 13 जुलै रोजी 1 हजार 803, 14 जुलै रोजी 1 हजार 718, 15 जुलै 1 हजार 757,16 जुलै 2 हजार 060, 17 जुलै 1 हजार 570 या करण्यात आलेल्या चाचण्या आहेत.