अहमदाबाद : वृत्तसंस्था – या संपूर्ण सिझनमध्ये सातत्यपूर्ण खेळ केलेल्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स या बलाढ्य संघांमध्ये आज फायनल मॅच झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात थोडी चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
गुजरातच्या बॉलर्सचे उत्तम प्रदर्शन
या सामन्यात गुजरातचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिक पंड्याने उत्तम कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. मोहमद्द शमीने 1, राशिद खानने 1, साई किशोरने 2 तर यश दयाळने 1 विकेट घेतली. गुजरातच्या बॉलर्सनी राजस्थानवर पहिल्यापासूनच दबाव निर्माण केला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 20 ओव्हरमध्ये फक्त 130 धावाच करता आल्या.
IPL 2022 | Gujarat Titan beats Rajasthan Royals by 7 wickets, wins its maiden IPL trophy.
— ANI (@ANI) May 29, 2022
हे सहज सोप्पे लक्ष्य पार करताना गुजरातची (Gujrat Titans) सुरुवात काहीशी खराब झाली. वृद्धिमान साहा आणि म्यॅथु वेड हे दोघेजण स्वस्तात माघारी परतले. यानंतर शुभमन गिल आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने डाव सावरला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले. या सामन्यात हार्दिक पंड्याने बॉलिंग आणि बॅटिंगने कमाल करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देत 3 विकेट घेतल्या तर बॅटिंगमध्ये 30 बॉलमध्ये 34 केले आहेत. या सामन्यात शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 32 रन करून गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात विशेष म्हणजे कोणत्याही फलंदाजाला एकही अर्धशतक करता आलेली नाही. राजस्थानकडून बोल्ट, कृष्णा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या विजयाबरोबर गुजरातने मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएल इतिहासामध्ये 2011 पासून आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सनाच पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून आयपीएल ट्रॉफी जिंकता आली आहे. मुंबई ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफींवर आपलं नाव कोरलं, यातल्या 3 वेळा मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. इतर कोणत्याही टीमना लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे गुजरातने आता हि ट्रॉफी जिंकून मुंबईच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याचसोबत आयपीएललला 5110 दिवसांनंतर पहिलीच आयपीएल खेळून जिंकणारी गुजरात पहिलीच टीम ठरली आहे.