नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूस वाला (sidhu moosewala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मूस वाला (sidhu moosewala) यांनी मानसातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा ‘आप’चे डॉ. विजय सिंगला यांनी 63,323 मतांनी पराभव केला होता.
मूळचे मानसा जिल्ह्यातील मूसा या गावातील, मूस वाला (sidhu moosewala) यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना मानसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्याने, तत्कालीन मानसाचे विद्यमान आमदार, नजर सिंग मनशाहिया यांनी वादग्रस्त गायकाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचे सांगत पक्षाविरुद्ध बंड केले होते. त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते.
त्याच्या मृत्यूमुळे पंजाब काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर एकूण 30 हून अधिक राऊंड फायर करण्यात आले होते. या हल्ल्यात अजून दोघेजण जखमी झाले आहेत. मूस वाला यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे पण वाचा :
दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर
कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात
नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?
जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे