गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. विजय रुपाणी यांनी काही दिवसांपूर्वी राजीनाम्याचे संकेत दिले होते. अखेर आज त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

रुपाणी यांनी म्हटले आहे की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाच वर्षे मला मुख्यमंत्री पद मिळाले ही खूप मोठी गोष्ट होती. जेपी नड्डा जी यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे.

आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. आम्ही पद म्हणत नाही, आम्ही जबाबदारी म्हणतो…. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.

You might also like