हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरी वर बसायला लागेल अशी टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुलाबराब पाटील यांनी पलटवार केला आहे. चुना कसा लावायचा हे संजय राऊतला माहित नाही, योग्य वेळी चुना लावू असे प्रत्युत्तर गुलाबराव यांनी दिले. ते गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांच्या बैठकीत बोलत होते.
गुलाबराव म्हणाले, आपल्या जीवनाचा संघर्ष काही लोकांना माहित नाही. आज आम्ही जे काही आहोत यात संघटनेचा वाटा ८०% आहे आणि आमची मेहनत २० % आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही असा टोला गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना लगावला . 92 च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असंत हे त्यांना माहीत नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-
शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील याना विशेष लक्ष्य केलं. गुलाबराव पाटील हे साधी पानटपरी चालवायचे, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आमदार केलं, उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिपद दिले. आणि आज आमच्यावर तंगड वर करताय?? तुम्हाला पुन्हा एकदा पानटपरी वर बसायला लागेल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.