Saturday, June 3, 2023

… तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते मोठ मोठे गौप्यस्फोट करू लागले लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती आणि भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.

गुलाबराव पाटील यांनीआज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केलाय. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती.

आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आणि आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिंदे सरकार कोसळणार असल्याची विधाने केली जात आहेत. मात्र, आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.