मोठी बातमी! प्रसिद्ध कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर

0
1
Gulzar And Jagadguru Rambhadracharya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देखील हा पुरस्कार जाहीर केला गेला आहे. याबाबतची माहिती आज ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीकडून देण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नुकत्याच ज्ञानपीठ निवड समितीकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ज्ञानपीठ 2023 पुरस्कार दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.” यापूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील प्रसिद्ध लेखक दामोदर मौजो यांना सन्मानित करण्यात आला होता. आता याच पुरस्काराचे मानकरी गुलजार आणि रामभद्राचार्य ठरले आहेत.

दरम्यान, आपल्या गझल कवितांमधून आणि गाण्यांमधून गुलजार यांनी नावलौकिकता मिळवली आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. गुलजार यांच्या शेरोशायरी तर जगभर प्रसिद्ध आहेत. गुलजार यांनी साहित्य क्षेत्रात देखील मोठे योगदान दिल्यामुळे त्यांना अनेक नामांकित पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.

तर, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील ‘तुलसीपीठ’चे संस्थापक आहेत. त्यांनी अपंगांसाठी एक विद्यापीठ आणि शाळा देखील सुरू केली आहे. रामभद्राचार्य यांनी 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. याचबरोबर 250 पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. संस्कृत भाषा, वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक म्हणूनच रामभद्राचार्य यांची ओळख आहे.