अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक उपाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावर गोळीबार

Prasad Konde Deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे – देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. प्रसाद कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकाकडुन देखील अज्ञाताना भिती दाखवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

प्रसाद कोंडे-देशमुख हे वीर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील नाथमंदीर व मोर्वे (ता.खंडाळा) येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन मोर्वे- वाघोशी रस्त्यावरून लोणंदकडे आपल्या चारचाकी वाहनातुन (गाडी क्रमांक एमएच12, युजी 999) निघाले होते. यावेळी समोरुन दुचाकीवरून येणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणुन कोंडे – देशमुख यांच्या सुरक्षारक्षकाने सुद्धा गोळीबार केला.

या घटनेत सुदैवाने जीवित कोणाला दुखापत झाली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे .