हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र वकील गुणारत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती पदावरून पवारांना टोला लगावला आहे. राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते अस म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतिपदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवलं जातंय
ते पुढे म्हणाले, आत्तापर्यंत राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे, अस म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला. राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे शरद पवारांनीच विचार करावा, या पदावर जायचे की नाही, असेही सदावर्ते म्हणाले.