गुणरत्न सदावर्तेंच्या सहकार्याला औरंगाबादेतून अटक 

 

औरंगाबाद – शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.

एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद येथे अकोला पोलिसांनी त्याला अटक केली. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन गुणरत्न सदावर्तेंना दिल्याचा ठपकाही त्याच्यावर आहे. एसटी आंदोलनात सुरुवातीला अजय गुजरचा मोठा सहभाग होता. मात्र सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर गुजरने आंदोलनातून माघार घेतली. पण, आता त्याला पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याने पैसे मागितल्याचा व्हीडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.